Mumbai Food: स्ट्रीट फूड लव्हर आहात? मुंबईतील 7 खाऊ गल्ल्यांमध्ये होईल मन तृप्त, PHOTO

Last Updated:
Mumbai Food: मायानगरी मुंबईला स्वप्नांचं शहर म्हणून ओळखलं जातं. असं म्हणतात, या शहरात कमीत कमी पैशांत पोटभर जेवण करता येतं. मुंबईत विविध उत्तम चवीचे रेस्टॉरंट्स, ढाबे आणि स्ट्रीट फूडचे पर्याय आहेत. अनेक ठिकाणी अत्यंत कमी किंमतीत उत्तम दर्जाचे खाद्यपदार्थ मिळतात. मुंबईत सर्वोत्तम स्ट्रीट फूड मिळणाऱ्या 7 खाऊगल्ल्यांबाबत याठिकाणी माहिती देण्यात आली आहे.
1/7
एसएनडीटी ते क्रॉस मैदान खाऊ गल्ली : एसएनडीटी हे मुंबईतील प्रसिद्ध कॉलेज आहे. तिथून ते क्रॉस मैदानापर्यंत असलेली खाऊ गल्लीसुद्धा फार लोकप्रिय आहे. येथील फास्ट फूड आणि चाटला विशेष मागणी असते. पावभाजी, आलू चाट, चायनीज मंचुरियन, कॉर्न कॉब, मिल्कशेक, फ्रुट ज्यूस, बॉम्बे सँडविच, व्हेज फ्रँकी, इत्यादी विविध पदार्थ मिळतात.

advertisement
2/7
खारघर खाऊ गल्ली : उत्सव चौकाजवळ असलेली ही खाऊ गल्ली ऑफिस आणि कॉलेजला जाणाऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. येथील भोजनालयांमध्ये फ्राइड राइस, नूडल्स, मंचुरियन, वडापाव, डोसा, लिट्टी चोखा, शॉवरमा आणि मोमोज सारखे विविध स्वादिष्ट पदार्थ मिळतात. तसेच फ्राइड मोमोज, शेझवान मोमोज, चिकन मोमोज आणि मोमो चाटही इथं लोकप्रिय आहेत.

3/7
मोहम्मद अली रोड खाऊ गल्ली : मुंबईतील सर्वोत्तम मांसाहारी स्ट्रीट फूडचा आस्वाद घेण्यासाठी हे ठिकाण प्रचंड लोकप्रिय आहे. शॉवरमा, मसालेदार टिक्का आणि कबाबपासून ते मऊ नान, फिरनी आणि मालपुआपर्यंत वेगवेगळे पदार्थ याठिकाणी मिळतात. मिनारा मशिदीच्या शेजारी असलेलं हे फूड स्ट्रीट रमजान काळात खवय्यांनी अक्षरश: खचाखच भरलेलं असतं. इतकंच काय नल्ली निहारी आणि हलीमसारखे लोकप्रिय पदार्थ देणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये बॉलिवूड स्टार्सही वारंवार येतात.

4/7
प्रिन्सेस स्ट्रीट खाऊ गल्ली : झवेरी बाजार आणि मंगलदास मार्केटजवळ असलेली ही गल्ली म्हणजे मुंबईतील लोकप्रिय फूड स्ट्रीटपैकी एक. समोसा चाट, आइस्क्रीम चाट, बदाम हलवा, जिलेबी रबडी आणि आलू पापडी अशा प्रकारची विविध मिठाई आणि स्नॅक्स इथं मिळतात. येथील ज्यूस, मिल्कशेक आणि इतर पेय देखील फार लोकप्रिय आहेत.

5/7
माहिम खाऊ गल्ली : माहिम दर्ग्याजवळ असलेलं हे लोकप्रिय स्ट्रीट फूड डेस्टिनेशन आहे. सर्वोत्तम मांसाहारी पदार्थांसाठी हे ठिकाणं ओळखलं जातं. कॉलेजचे विद्यार्थी, ऑफिसला जाणारे लोक आणि पर्यटकांनी ही गल्ली खचाखच भरलेली असते. खिचडा, खिरी, बैदा रोटी, चिकन तंदूरी, मोमोज, रगडा चाट, ड्राय कुल्फी फालुदा आणि आईस्क्रीम फालुदाला इथे विशेष मागणी असते.

6/7
कार्टर रोड खाऊ गल्ली : समुद्रकिनारी थंडगार वातावरणात बसून गरमागरम पदार्थांचा आस्वाद या ठिकाणी घेता येतो. वांद्रे प्रोमेनेडजवळ असलेल्या या फूड स्ट्रीटवर दर्जेदार फूड स्टॉल्स आहेत. इथं रोल्स, मोमोज, शावरमा, फलाफल, कबाब, इत्यादी खाद्यपदार्थांचे भरपूर पर्याय मिळतात. गुलाब जामुन, फ्रोझन योगर्ट, वेफल्स, इत्यादी गोड पदार्थही इथं असतात.

7/7
घाटकोपर खाऊ गल्ली : घाटकोपर पूर्वेला असलेली ही खाऊ गल्ली उत्कृष्ट चवीच्या शाकाहारी पदार्थांसाठी ओळखली जाते. इथं जिनी डोसा, मंचुरियन डोसा, चीज बर्स्ट डोसा, नूडल डोसा, मसाला डोसा, आयलँड डोसा आणि आइस्क्रीम डोसासह 45 हून अधिक डोसे मिळतात. तसेच याठिकाणी पाणीपुरी, दाबेली, फाफडा, जिलेबी, कबाब, ब्रेड सँडविच, पनीर शेझवान फ्रँकी, पिझ्झा शॉट्स, इत्यादी विविध पदार्थ पाहूनच तोंडाला पाणी सुटतं.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement