Gulchadi Farming : शिक्षण डॉक्टरकीचं ओढ मात्र शेतीची! गुलछडी लागवडीतून तरुणी करतेय लाखोंची कमाई

Last Updated:
Gulchadi Farming: आजही अनेक उच्चशिक्षित तरुणांना शेतीची कामं करण्यात कमीपणा वाटतो. शेती हे क्षेत्र कमी शिकलेल्या लोकांसाठी आहे, असा अनेकांचा समज आहे. मात्र, सोलापूरमधील एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीने हा समज खोटा ठरवला आहे. या तरुणीने अतिशय कमी क्षेत्रात गुलछडी या फुलांची लागवड करून चांगला नफा मिळवला आहे.
1/5
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावात राहणाऱ्या प्रीती लोखंडे या तरुणीला शेतीची आवड आहे. प्रीती सोलापुरातील एका खासगी आयुर्वेदिक महाविद्यालयात BAMSचं शिक्षण घेत आहे. म्हणजे भविष्यात प्रीती डॉक्टर म्हणून ओळखली जाईल. तिला मात्र शेतीमध्ये रमायला आवडतं.

advertisement
2/5
प्रीतीला शेतीची प्रचंड आवड आहे. त्यामुळे उच्चशिक्षणाबरोबरच तिने शेती करण्याचा निर्णय घेतला. तिने गावाकडे असलेल्या 10 गुंठ्यात गुलछडी फुलाची लागवड केली. यासाठी तिला 30 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे.

3/5
प्रीतीने केलेल्या फुलशेतीमध्ये तिला प्रचंड यश मिळालं आहे. तिच्या शेतातील गुलछडीची विक्री मुंबईतील दादर मार्केटमध्ये होते. फुलांच्या वेण्या, गजरे व पुष्पहार बनवण्यासाठी या सुवासिक फुलांचा उपयोग होतो. सध्या गणेशोत्सवामुळे गुलछडीला किलोमागे चांगला भाव मिळत आहे.

4/5
प्रीतीने गुलछडीच्या शेतीमध्ये प्रथमतः शेडनेट मारून गुलछडीची लागवडीचा प्रयोग केला आहे. यामुळे गवत काढण्यासाठी आणि खुरपणीसाठी होणारा खर्च सुद्धा वाचला आहे. उच्च शिक्षण घेताना शेतीतून अधिकाधिक उत्पन्न मिळवता येऊ शकतं, हे प्रीतीने सिद्ध करून दाखवलं आहे.

5/5
गुलछडी शेती करण्यासाठी, जून-जुलै महिन्यात तीन वर्षांच्या कंदांची लागवड करावी लागते. एकदा लागवड केलेल्या या गुलछडी फुलांपासून प्रीतीने 3 वर्षात 3 लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. या नफ्याच्या पैशांतून प्रीतीच्या शैक्षणिक खर्चाला हातभार देखील लागला आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement