Vande Bharat: रेल्वेच्या ताफ्यात वेगवान गाडी दाखल, दोन महत्त्वाच्या शहरांना देणार सेवा

Last Updated:
Vande Bharat : महाराष्ट्रातील रेल्वे सेवेत एका नवी गाडीची भर पडली आहे. भारतीय रेल्वेच्यावतीने नागपूर आणि पुणे या दोन शहरांदरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची सेवा सुरू करण्यात आली आहे. नागपूरमधील अजनी ते पुणे ही देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस ठरली आहे.
1/5
नागपूर आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास अधिक सोयीस्कर व जलद करण्यासाठी अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. नागपूर-पुणे मार्गावर प्रवाशांची सतत वाढणारी गर्दी लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

advertisement
2/5
रविवारी (10 ऑगस्ट) नागपुरातील अजनी रेल्वे स्टेशनवर झालेल्या भव्य लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. सुरू झालेल्या नवीन गाडीमुळे महाराष्ट्रातील रेल्वेच्या ताफ्यात एका नवीन वेगवान गाडीची भर पडली आहे.

3/5
ही गाडी 881 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. पारंपरिक मेल किंवा एक्सप्रेस गाड्यांना हा प्रवास पूर्ण करण्यासाठी साधारण 15 ते 16 तास लागतात. वंदे भारत हेच अंतर केवळ 12 तासांत पार करणार आहे.

4/5
सणासुदीच्या काळात किंवा इतर विशेष प्रसंगी नागपूर-पुणे मार्गावरील खासगी बससेवा पाच हजार रुपयांपर्यंत भाडे आकारते. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. मात्र, आता सुरू झालेल्या वंदे भारतमुळे प्रवाशांना आरामदायी व किफायतशीर पर्याय उपलब्ध झाला आहे. 

5/5
881 किलोमीटर अंतराचा प्रवास वंदे भारतच्या वेगवान तंत्रज्ञानामुळे अधिक सुलभ होणार आहे. या गाडीत आधुनिक डिझाइन, आरामदायी आसने, उत्तम एसी अशा सुविधा उपलब्ध आहे. रेल्वे प्रशासनाने तिकीट बुकिंग सुविधा सुरू केली आहे. प्रवासी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तिकीट बूक करू शकतील.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement