Weather Alert: विजा कडाडणार, पुणे, साताऱ्याला पाऊस झोडपणार, 7 जुलैचा हवामान अंदाज
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: राज्यात मान्सूनचा जोर असून पुणे ते कोल्हापूर घाटमाथ्यावर देखील पावसाचं धुमशान सुरू आहे. आज पुन्हा हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
advertisement
पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर अधिक राहिला. धरणक्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. तर घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळत आहे. मागील 24 तासात पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात 5.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 27.2 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर परिसरात 3 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. संततधार पावसाने धरण आणि नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. पुढील 24 तासात कमाल तापमान 28 अंशावर स्थिर राहील. तसेच कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात जोरदार पाऊस कोसळला. सातारा परिसरामध्ये 11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 27.2 अंश सेल्सिअस राहिल. सातारा जिल्ह्यामध्ये ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. घाटमाथ्यावर मात्र जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यात 1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या शिराळा परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात ढगाळ आकाशासह मध्यम पावसाचा अंदाज आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 30 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता 90 टक्के, तर उर्वरित जिल्ह्यात 73 ते 86 टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत 70 ते 84 टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ताशी 22 ते 30 किमी इतका अधिक राहील. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.










