Weather Alert: पुणे ते कोल्हापूर धो धो पाऊस, सोलापुरात मात्र वेगळेच चित्र, आजचा हवामान अंदाज
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत पावसाची रिपरिप कायम आहे. आज पुन्हा घाटभागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर सोलापुरात वेगळेच चित्र आहे.
advertisement
सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात जोरदार पाऊस कोसळला. सातारा परिसरामध्ये 9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस राहिल. आज ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पाऊस सुरु असून पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहिला. धरणक्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. तर घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळत आहे. मागील 24 तासात पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात 8.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 28.6 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस असून दक्षतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची तीव्रता कायम आहे. कोल्हापूर परिसरात 8 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. यावेळी कमाल तापमानात घट नोंदविण्यात आली. कमाल तापमान 26.6 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमान 27 अंशावर स्थिर राहील. तसेच कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. तसेच वाऱ्यांचा वेग ताशी 22 ते 30 किमी इतका राहण्याची शक्यता आहे. सातारा, पुणे आणि कोल्हापूर घाट परिसरात अतिवृष्टी तसेच जिल्हाअंतर्गत परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.





