Weather Alert: धरणक्षेत्रात धो धो सुरूच, पुणे ते कोल्हापूर पुन्हा अलर्ट, आजचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: गेल्या काही काळात पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागात जोरदार पाऊस होतोय. आज पुन्हा कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मान्सून सक्रिय झाल्याने राज्याच्या विविध भागांत हलका ते जोरदार पाऊस सुरू आहे. आज 9 जुलै रोजी कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटभागात जोरदार पावसाची शक्यता असून इतरत्र हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुढील 24 तासांचा जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळतो आहे. सातारा परिसरामध्ये 15 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू असून येत्या 24 तासात वक्र दरवाजे उघडण्याची शक्यता जलसिंचन विभागाने वर्तवली आहे. आज जिल्ह्यामध्ये ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पाऊस सुरु असून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
पुणे जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून घाटमाथ्यावर पाऊस कोसळत आहे. मागील 24 तासात पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात 0.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 28.4 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस असून दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement