Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, सोलापूरवर पुन्हा संकट, शनिवारचं हवामान अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून मान्सूनने माघार घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस उघडला असून तापमानाचा पारा चढला आहे.
महाराष्ट्रातून मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. पावसाने उघडीप दिली असल्याने राज्यात 'ऑक्टोबर हीट’चा चटका वाढला आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सातत्याने तिशीपार असून आज 11 ऑक्टोबर रोजी राज्यात पावसाच्या उघडिपीसह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
पुणे जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची उघडीप राहीली. यावेळी 32.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिले. आज पुणे जिल्ह्यात दिवसभर निरभ्र आकाश राहणार असून रात्री अंशतः ढगाळ आकाश होईल.
advertisement
गेल्या 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 31.5 अंश सेल्सिअस इतके राहीले. आज संपूर्ण साताऱ्यासह सातारा घाटमाथ्यावर हलक्या पावसासह आकाश ढगाळ राहण्याची हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी 30.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस इतके राहिल.
advertisement
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 34.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, कोणताही महत्त्वाचा अलर्ट नाही. यावेळी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस इतके राहिल.
advertisement
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 32.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 32.5 अंश सेल्सिअस इतके राहिले. पुढील 24 तासात जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
advertisement