Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, 25 ऑगस्टला धो धो पाऊस, 11 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Alert: 25 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 24 तासांसाठी 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/7
राज्यात पावसाचा जोर कमी झालेला दिसून येत आहे. अशातच ऊन सावल्यांचा खेळ सुरू असून हलक्या सरी देखील बरसत आहेत. 25 ऑगस्ट रोजी कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह पावसाची मुख्यतः उघडीप राहण्याची शक्यता आहे.

advertisement
2/7
मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह पालघर, ठाणे जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा घाटमाथा परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

6/7
विदर्भातून पावसाने काढता पाय घेतला आहे. विदर्भात कुठलीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ यासर्व जिल्ह्यांत काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश राहण्याची शक्यता आहे.

7/7
25 ऑगस्ट रोजी राज्यात बहुतांश भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement