Weather Alert: बाप्पाच्या आगमनाला पावसाचा बँडबाजा, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार हजेरी, आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Weather Alert: गणपती बाप्पाच्या आगमनाला राज्यात पावसाचा जोर राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांत आज जोरदार पावसाचा अंदाज आहे.
1/5
महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून गणेश आगमानाला काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकाडून गणेश चतुर्थीच्या दिवशी 26 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील आज जोरदार पावसाची शक्यता असून पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

advertisement
2/5
पुण्याच्या घाट परिसरात आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. 27 ऑगस्टला विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित पुणे जिल्ह्यात पावसाचा कोणताही महत्त्वाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे .

3/5
सातारा जिल्ह्यात कोणताही विशेष अलर्ट देण्यात आला नाही. मात्र, जिल्ह्याच्या घाट परिसरात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तासांत घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

4/5
कोल्हापूर जिल्ह्यात पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्हा तसेच घाटमाथ्याच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेगवान वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

5/5
सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात आजही हवामान खात्याकडून कोणताही विशेष अलर्ट देण्यात आला नाही. येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही काळ या भागात अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement