advertisement

Weather Alert: आता सुरू होणार श्रावण धारा, मुंबईसह महाराष्ट्राला नवा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत असून काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुढील 96 तास कोकणात पावसाचं धुमशान राहणार असून अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
1/7
राज्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. गेल्या काही दिवसांत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 24 तासांत पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना यलो तर काहींना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. 22 जुलैचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

2/7
राज्यातील मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई, ठाण्याला यलो अलर्ट देण्यात आला असून या काळात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

3/7
दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या तिन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील 4 दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे.

4/7
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तर सह्याद्रीच्या घाट भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये विजासह काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.

5/7
मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेडमध्ये विधानसह आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून जोरदार पावसाची शक्यता. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्‍यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

6/7
विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात दिखील पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे.

7/7
दरम्यान, राज्यातील हवामानाची हीच स्थिती पुढील काही दिवस कायम राहणार आहे. कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement