Maharashtra Weather Alert: छत्री सोबत ठेवा, श्रावणात फसवा पाऊस, पुणे ते कोल्हापूर आजचा हवामान अंदाज
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. महिनाअखेर पावसाच्या हलक्या सरी बरसणार असून फसवा पाऊस असणार आहे.
राज्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी, काही ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात श्रावण सरी कोसळत आहेत. आज 31 जुलै रोजी विदर्भात विजांसह जोरदार पवसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने दक्षतेचा इशारा दिला आहे. तसेच उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. घाटमाथ्यावर आणि धरणक्षेत्रात देखील पावसाने विश्रांती घेतली आहे. मागील 24 तासात पुणे जिल्ह्यात 2.8 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. यावेळी कमाल तापमानाचा पारा 26.5 अंश सेल्सिअस होते. पुढील 24 तासात संपूर्ण पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्‍यता असून कमाल तापमान 29 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







