Weather Alert : महाराष्ट्रात आता धडकणार सुपर कोल्ड लाट, हवामान खात्याकडून अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यातील धुळे जिल्ह्यांत सर्वात कमी 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भातील तापमानही 9 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलंय.
advertisement
advertisement
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातही गारठा कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुणे शहरात कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
advertisement
उत्तर महाराष्ट्रातील तापमानात सर्वाधिक घट बघायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी निरभ्र आकाश राहून वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच 10 डिसेंबरपासून उत्तर महाराष्ट्रात थंडी सक्रिय होण्याची शक्यता आहे.
advertisement
गेल्या काही दिवसांत विदर्भात थंडीची लाट बघायला मिळत आहे. विदर्भातील गोंदिया, नागपूर आणि वर्धा या तीन जिल्ह्यांत शीत लहरींचा इशारा देण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याचबरोबर विदर्भातील इतरही जिल्ह्यांत तापमानात घट बघायला मिळत आहे.







