Weather Alert: तुफान आलंया! महाराष्ट्रात शनिवारी जोरदार पाऊस, 20 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
20 सप्टेंबर रोजी देखील राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील एकूण 20 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
1/7
तेलंगणा आणि विदर्भाच्या सीमेवर तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. 20 सप्टेंबर रोजी देखील राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील एकूण 20 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. पाहुयात राज्यात 20 सप्टेंबर रोजी हवामान कसं असेल.

advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगर सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण असेल. तर सायंकाळी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर मुंबईत कमाल तापमान 30 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढे राहील. तर कोकणात काही ठिकाणी मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट देण्यात आला नाही.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये विजांसह आणि 30 ते 40 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

4/7
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या पाचही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या पाचही जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

5/7
मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड वगळता उर्वरित छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी आणि लातूर या सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील या सहा जिल्ह्यांत विजांसह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

6/7
विदर्भातील सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पूर्व विदर्भात नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे

7/7
दरम्यान, पुढील किमान चार दिवस पावसाची सक्रियता कायम राहण्याची शक्यता आहे. या पावसाचा जोर मुख्यतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात असणार आहे. तर विदर्भात देखील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement