Thar ची फक्त चाकं उरली, 2 दिवस चौघांचे मृतदेह ताम्हिणी घाटातच होते पडलेले, गाडीचे PHOTOS समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
थार कार घेऊन सहा मित्रांनी पुण्यातून कोकणात जाण्याचा प्लॅन केला होताा. ताम्हिणी घाटातून जात असताना एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि थार कार थेट 500 फूट खोल दरीत कोसळली. (मोहन जाधव, प्रतिनिधी)
रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटामध्ये एका अपघातामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुण्यातून कोकणात निघालेल्या मित्रांची महिंद्रा थार 500 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात गाडीतील ६ जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, 20 दिवसांपूर्वीच ही थार खरेदी करण्यात आली होती. तब्बल २ दिवस त्यांचे मृतदेह हे दरीत पडलेले होते. जेव्हा ड्रोनच्या मदतीने शोध घेतला तेव्हा गाडी आढळली.
advertisement
advertisement
advertisement
मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील मृत हे सगळे पुण्यातील रहिवासी होते. २० दिवसांपूर्वीच महिंद्रा थार खरेदी केली होती. थार कार घेऊन सहा मित्रांनी पुण्यातून कोकणात जाण्याचा प्लॅन केला होताा. ताम्हिणी घाटातून जात असताना एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि थार कार थेट 500 फूट खोल दरीत कोसळली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अपघात स्थळावर फॉरेन्सिक टीम दाखल- दरम्यान, ताम्हिणी घाटातील एका मुख्य वळणावर एक थार कार वेगात येवून 500 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आल्यानंतर ताम्हिणी घाटातील या अपघातग्रस्त स्थळी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे. अपघाताचे मूळ कारण आणि अपघात स्थळावरून हवेत गेलेली थार 500 फूट खोल दरीत किती वेगात कोसळली, असावी याचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीमचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले आहे.
advertisement


