Pune Rain Alert: पुढील 24 तास मुसळधार पावसाचे, पुणे आणि साताऱ्याला अलर्ट, पाहा हवामानाचा अंदाज
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यात पावसाचा जोर कमी होणार असला तरी पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पाहुयात पश्चिम महाराष्ट्रातील हवामान कसे असेल.
advertisement
advertisement
मागील 24 तासांमध्ये सातारा शहरात 7 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. यावेळी कमाल तापमान 27.8 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमान 29 अंशावर राहील. ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कमी झाली आहे. मागील 24 तासात शिवाजीनगर परिसरात 3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच 29.6 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिले. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मागील 24 तासात कोल्हापूर परिसरात 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस वर असेल. हलक्या पावसासह आकाश साधारणपणे ढगाळ राहील.
advertisement
advertisement
advertisement





