Weather Alert: रेनकोट ठेवून द्या अन् स्वेटर काढा, पश्चिम महाराष्ट्रात हवापालट, IMD चं महत्वाचं अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असली तरी अवकाळी संकट टळणार आहे.
राज्यात पावसाने उघडीप दिल्याने तापमानात चढ-उतार होत आहेत. कमाल तापमानाचा पारा 30 अंशांच्या वर असून, किमान तापमानाचा पारा 20 अंशांच्या खाली येऊ लागला आहे. आज 6 नोव्हेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


