Weather Alert: पुन्हा मुसळधार! पुणे ते कोल्हापूर 24 तासांत हवापालट, 20 जूनचा हवामान अंदाज
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune Rain Alert: पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत पावसाच जोर ओसरला आहे. आज काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
advertisement
साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. कोयनानगर येथे 133 मिलिमीटर, नवजाला 158 मिलिमीटर आणि महाबळेशवरला 153 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच सातारा शहरात 9 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. पुढील 24 सातारा जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलका पाऊस असेल. मात्र सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.
advertisement
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे सर्वाधिक 195 तर येथे लोणावळा येथे 160 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारी आळंदी परिसरात पावसामुळे इंद्रायणी तुडूंब वाहू लागली. त्यामुळे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थाना दिवशीच इंद्रायणी स्नान बंद ठेवावे लागले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement







