Weather update : पुढील 48 तास महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस, या भागांसाठी IMD कडून धोक्याचा अलर्ट

Last Updated:
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. वादळाचा देखील इशारा देण्यात आला आहे.
1/7
महाराष्ट्रात मान्सूननं सर्वदूर हजेरी लावली आहे. गेले काही दिवस पावसाचा जोर मंदावला होता. मात्र आता पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाला असून, राज्यातील विविध भागांमध्ये हवामान विभागाकडून (IMD) आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

advertisement
2/7
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

3/7
उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

4/7
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

5/7
विदर्भात देखील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भात अजूनही म्हणावा असा पाऊस न झाल्यानं शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

6/7
मुंबईबाबत बोलायचे झाल्यास मुंबईमध्ये पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईचं कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

7/7
दरम्यान नुसता पाऊस पडणार नसून पावसासोबत वादळाचा इशारा देखील हवामान विभागानं दिला आहे. या काळात राज्यात वाऱ्याचा वेग ताशी 50 - 60 किमी इतका राहण्याचा अंदाज आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement