Weather Update : IMD कडून अनेक राज्यांमध्ये पुन्हा पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय स्थिती? जाणून घ्या एका क्लिकवर

Last Updated:
देशभरात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. मात्र दुसरीकडे पुन्हा एकदा अनेक राज्यांमध्ये आयएमडीकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
1/5
देशभरात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. अनेक राज्यांमध्ये तापमानात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळतय. जम्मू- काश्मीरच्या अनेक भागांमध्ये तापमान शुन्य डिग्री सेल्सिअसच्या देखील खाली पोहोचलं आहे. तर काही भागात एक डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये दाट धुक्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

advertisement
2/5
भारतीय हवामान विभाग आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस देशातील अनेक भागात तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. मात्र त्यानंतर भारताच्या उत्तरेकडील राज्य, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.

3/5
तर दुसरीकडे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख आणि गिलगिट -बाल्टिस्तानमध्ये हिमवृष्टीसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

4/5
आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात देशभरात तापमानात आणखी घट होऊन थंडी वाढणार आहे. उत्तर भारतामध्ये थंडीला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतासोबतच महाराष्ट्रातही आता तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

5/5
दरम्यान महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास पुढील काही दिवस राज्यात कोरडं वातावरण राहणार असून, पावसाची शक्यता नाही. राज्यातील अनेक भागात तापमानात घट होऊन थंडी जाणवू लागली आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement