आजचं हवामान: पश्चिम महाराष्ट्रावर आस्मानी संकट, 24 तास धोक्याचे, पुण्यात वेगळीच स्थिती
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांवर आज आस्मानी संकट घोंघावत असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. पुण्यात मात्र वेगळीच स्थिती आहे.
राज्यभर उष्णतेने कहर केला आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी आणि अकोला येथे तापमानाने 45 अंशांचा उच्चांक गाठला. तर पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलंय. आज, 26 एप्रिल रोजी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तासांची हवामान व तापमान स्थिती जाणून घेऊ.
advertisement
गेल्या 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान 21.0 ते 43.5 अंश सेल्सिअस दरम्यान राहीले. सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी कमाल तापमान 42.3 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28.9 अंश सेल्सिअस इतके होते. पुढील 24 तासांसाठी सोलापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह गारपीटीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज कमाल तापमान 42 अंशांवर तर किमान 27 अंशांवर राहील.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. हातकणंगले येथे 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे उकाड्याने त्रासलेल्या नागरिकांना तात्पुरता गारवा मिळाला असून पुढील 24 तासात कोल्हापुरातील पारा काही अंशी उतरून कमाल 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतका राहील. तसेच वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement