Weather Alert: वादळी पाऊस अन् गारपीट होणार, दुपारनंतर मोठं संकट, सोलापूरसह 4 जिल्ह्यांना अलर्ट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांवर आस्मानी संकट घोंघावत असून वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. कोल्हापुरातील पारा 32 अंशापर्यंत उतरला असून पुढील 24 तासात कोल्हापुरातील पारा उतरलेला राहू शकतो. कमाल 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील. तसेच वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
सातारा जिल्ह्यातील पारा पुढील 24 तासात स्थिर राहील. कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आकाश अंशतः ढगाळ राहून तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या गडगडाटाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. खटाव तालुक्यातील मायणी परिसरास गारांनी झोडपून काढले.
advertisement
advertisement
advertisement
दरम्यान, विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापुरात सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं. आज मात्र, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून पुण्यात निरभ्र आकाशासह उन्हाचे चटके कायम आहेत.








