Weather Alert : हिटवेव पाठोपाठ पुन्हा अवकाळी पावसाचं संकट! या तीन जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने दिला अलर्ट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाला पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
राज्यात 21 एप्रिल रोजी उन्हाचे चटके कायम राहणार असून बहुतांश भागांत मुख्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर आणि अकोला येथे उष्ण लाटेचा, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट कायम असला तरी उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
advertisement
तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाला पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. रविवार दिनांक 20 रोजी नागपूर येथे देशातील उच्चांकी 44.7 अंर सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान नोंद सोलापूर जिल्ह्यात कायम आहे.
advertisement
advertisement
दुपारनंतर सोलापूर जिल्ह्यात विजांचा गडगड डाटा सह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात उन्हाचे चटके वाढले आहेत. मागील 24 तासात पुण्यातील कमाल तापमान 39.4 तर किमान तापमान 20 अंशावर राहिले. पुढील 24 तासात पुण्यातील उष्णता कायम राहणार असून पारा 40 अंशावर राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
पुणे जिल्ह्यातील वातावरण निरभ्र राहील. सातारा जिल्ह्यातील पारा चांगलाच कडाडला असून मागील आठ दिवसांपासून 41 अंशांवर असलेला साताऱ्यातील उष्मा पुढील आठ दिवस देखील वाढतच राहणार आहे. आज साताऱ्यातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहिल. दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
advertisement
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यात 39.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशापासून विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला असून, तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान अनुभवायला मिळत आहे.








