Weather Alert: गारपीट अन् वादळी पाऊस झोडपणार, दुपारनंतर पुन्हा संकट, सांगली, सोलापूरला अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रावर उष्णतेची लाट अन् अवकाळी पावसाचं दुहेरी संकट घोंघावत आहे. आज पुन्हा सांगली, कोल्हापूर अन् सोलापूरला अलर्ट देण्यात आला आहे.
सूर्य आग ओकत असल्याने महाराष्ट्रतील अनेक भाग उष्णतेने होरपळत आहेत. मागील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान 20.0 ते 43.8 अंश सेल्सिअस दरम्यान राहीले होते. सोलापूर जिल्ह्यात पारा 43 अंशांवर असून उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील हवामान स्थितीबाबत अंदाज जाणून घेऊ.
advertisement
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात कमाल तापमान 43.8 अंश सेल्सिअस इतके होते. पुढील 24 तासांसाठी सोलापूर जिल्ह्याला उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 44 अंशांवर तर किमान तापमान 25 अंशांवर असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच दुपारनंतर गडगडाटी वादळासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
advertisement
advertisement
advertisement
सांगली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. तुरळक ठिकाणी गारपिटीची नोंद झाली. सांगलीतील कसबेडिग्रज, जत येथे प्रत्येकी 10 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहिल. जिल्ह्यात दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
advertisement