Weather Update: 24 तास महत्त्वाचे, सोलापुरात पारा पुन्हा चढला, पाहा पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून राज्यातील तापमानात चढ-उतार होताना दिसून येत आहे. पुढील 24 तासांत पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतील तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून राज्यातील तापमानात चढ-उतार होताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमानात घट होऊन विविध ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता पुन्हा हवामानात बदल जाणवत असून विविध ठिकाणी तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात देखील अंशतः वाढ झालेली बघायला मिळत आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सोलापूरमधील तापमानात उन्हाळ्याच्या सुरूवातीपासूनच वाढ बघायला मिळत आहे. आज तेथील कमाल तापमानात वाढ होऊन ते 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी आज निरभ्र आकाश असण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत सोलापुरातील तापमानात वाढ होऊन ते 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
advertisement








