आजचं हवामान : सोलापुरात पारा पुन्हा चढला, पुण्यात काय स्थिती? पाहा हवामान अंदाज
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. एप्रिलच्या सुरुवातील घोंघावणारे अवकाळी संकट आता सरले आहे. आता दुसऱ्या आठवड्यात हवापालट होत असून उष्णतेचा चटका पुन्हा वाढणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुढील 24 तासातील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
अवकाळी पावसाने विश्रांती घेताच राज्यात तापमानाच्या पाऱ्याने पुन्हा उसळी घेतली आहे. सूर्य तळपल्याने अनेक ठिकाणी 40 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. आज दिनांक 7 एप्रिल रोजी कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुढील 24 तासातील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 38 अंश तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील. दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, मराठवाड्यापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने राज्यासह दक्षिण भारतात ढगाळ हवामान आहे.