Priyadarshini Indalkar: "त्याला लग्न करायचं होतं, कारण..." प्रियदर्शनी इंदलकरने पहिल्यांदाच सांगितलं ब्रेकअपचं कारण
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
लोकप्रिय अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने एका मुलाखतीमध्ये तिच्या ब्रेकअपबद्दल खुलासा केला आहे. तिने तिचा ब्रेकअप कोणत्या कारणास्तव झाला? या मुद्द्यावर भाष्य केलंय
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने प्रसिद्धी मिळवली आहे. कायमच आपल्या कॉमेडीसाठी चर्चेत राहणारी प्रियदर्शनी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिने एका शोमध्ये तिचा अलीकडेच ब्रेकअप झाल्याचा खुलासा केला आहे.
कायमच सोशल मीडियावर सक्रिय राहणारी प्रियदर्शनी इन्स्टाग्रामवर अनेक फोटोज- व्हिडिओज शेअर करत असते. या माध्यमातूनच अभिनेत्री चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. अनेकदा कमेंटच्या माध्यमातून, प्रश्नोत्तराच्या सेशनमधून अभिनेत्रीला चाहते तिच्या रिलेशन स्टेटसबद्दल विचारपूस करण्याचा प्रयत्न करत असतात. अलीकडेच प्रियदर्शनीने प्रणित मोरेच्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये हजेरी लावली होती.
सध्या प्रियदर्शनी तिच्या 'लग्नाचा शॉर्ट' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या ती व्यग्र आहे. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी प्रियदर्शनीला प्रणितने "तू सिंगल आहेस का?" असा प्रश्न विचारला. यावर तिने हो असं उत्तर दिलं. तर प्रणितने तिला तुझा ब्रेकअप केव्हा झाला? या प्रश्नावर प्रियदर्शनीने एप्रिल 2025 मध्ये ब्रेकअप झाल्याचं उत्तर प्रणितला दिलं. त्यानंतर प्रणितने तिला ब्रेकअपचं कारण सुद्धा विचारलं.
advertisement
प्रियदर्शनीने ब्रेकअपचं कारण "जुळलं नाही, Compatibility नव्हती", असं उत्तर दिलं. पुढे प्रणितने प्रियदर्शनीला Toxic रिलेशनशिप होतं का? असा प्रश्न सुद्धा विचारला. त्यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की, “नाही… तो किंवा मी Toxic नव्हतो. पण आमचं रिलेशनशिपच Toxic झालं होतं.” पुढे ब्रेकअपचा निर्णय माझाच होता असं देखील म्हणाली. पुढे म्हणाली की “त्याला लवकर लग्न करायचं होतं. कारण तो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता आणि मला घाई नव्हती. यावरून आमच्यात वाद सुरू होते आणि मग त्यामुळे ते जमून आलं नाही.” यामुळे प्रियदर्शनीचं ब्रेकअप झाल्याचं तिने स्पष्ट केलं.
advertisement
सध्या प्रियदर्शिनी इंदलकर ‘लग्नाचा शॉट’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्यासोबत अभिजीत आमकर सुद्धा स्क्रीन शेअर करणार आहे. ‘लग्नाचा शॉट’ चित्रपट येत्या 6 फेब्रुवारी रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि लेखनाची धुरा अक्षय गोरे यांच्याकडे असून गीत, संगीताची जबाबदारी प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांच्याकडे आहे. तर अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी, सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 7:50 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Priyadarshini Indalkar: "त्याला लग्न करायचं होतं, कारण..." प्रियदर्शनी इंदलकरने पहिल्यांदाच सांगितलं ब्रेकअपचं कारण








