Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात अचानक हवापालट, सोलापूरचा पारा घसरला, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मे महिन्याच्या सुरुवातीलाच मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने महत्त्वाचा अलर्ट दिला आहे.
1/7
राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने कमाल तापमानात घट झाली आहे. आज 6 मे रोजी हवामान विभागाकडून राज्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

advertisement
2/7
मागील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान अंशतः घटले असून कमाल तापमान 40.6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18.2 अंश सेल्सिअस इतके राहिले. सोलापूर मध्ये 40.6 इतके सर्वाधिक तापमान नोंदले गेले. तर सोलापूर पाठोपाठ साताऱ्यातील पारा 37.9 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा निहाय हवामानाचे अंदाज जाणून घेऊ.

3/7
सातारा जिल्ह्यातील कमाल पारा 38 अंश सेल्सिअस तर किमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्याची तसेच पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा यलो अलर्ट दिला आहे.

4/7
काही दिवसांपासून 45 अंशापर्यंत तापलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पारा अंशता कमी होऊन 40.6 अंशावर राहिला. तसेच सोलापुरात दुपार नंतर ढगांच्या गडगडाटासह एक दोन वेळा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ढगाळ वातावरणाने तापमान अंशतः कमी होऊन 40 अंशावर राहण्याचा अंदाज आहे.

5/7
पुणे जिल्ह्यात उन्हाचा चटका कायम असून मागील 24 तासात 36.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात पुण्यातील पारा 38 अंशांवर राहण्याचा अंदाज आहे. तसेच आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारनंतर ढगाळ होईल. पुणे जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.

6/7
कोल्हापुरातील पारा 36 अंशापर्यंत असून पुढील 24 तासात कोल्हापुरातील तापमानात अंशत: घट राहील. कमाल 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके राहील. दुपारनंतर अंशतः ढगाळ आकाशासह एक दोन वेळा गडगडाटी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

7/7
सांगली जिल्ह्यातील कमाल तापमानात अंशतः घट दिसून येते. मागील 24 तासात सांगलीत 37.9 अंश सेल्सिअस तापमान राहिले. तसेच येत्या 24 तासात जिल्ह्यातील तापमान 37 अंशावर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होईल. एक दोन वेळा गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement