Rain Alert: ताशी 50 किमी वेगाने वारे वाहणार, अवकाळी झोडपणार, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात आज पुन्हा वादळी पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूरसह सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून 11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासासाठी साताऱ्यात गडगडाटी पावसाचा यलो अलर्ट आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगवान वाऱ्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. कमल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहिल.
advertisement
सांगली जिल्ह्यातील पलूस, कडेगाव, वाळव्यासह विविध ठिकाणी मध्यरात्री जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. आज कमाल तापमान 36 अंशांवर तर किमान तापमान 24 अंशांवर राहिल. आकाश अंशतः ढगाळ राहून मध्यम पावसाची शक्यता आहे. 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाच्या वादळी वाऱ्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. विदर्भापासून मराठवाडा ते उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. राज्यात वादळी पाऊस हजेरी लावत असून पुढील 24 तासात देखील राज्यातील बहुतांश जिल्ह्यांसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात वादळी पाऊस बरसणार आहे.