Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात वादळी पाऊस, हवामान विभागाने दिला 4 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आज दिनांक 9 जून रोजी राज्यातील काही भागांसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात 32.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच शिवाजीनगर परिसरात 5 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. पुढील 24 तासात कमाल तापमान 32 अंशावर राहिल. वादळासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
कोल्हापुरातील कमाल तापमान 32.1 अंशांवर राहिले आहे. पुढील 24 तासात कोल्हापुरातील कमाल तापमान 32 अंशावर स्थिर राहील. पुढील 24 तासात साधारणपणे ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहिल. गेल्या 48 तासात कोसळलेल्या 42.2 मिलीमीटर मुसळधारेनंतर साताऱ्यातील पावसाने काल विश्रांती घेतली.
advertisement
पुढील 24 तासात मात्र सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मागील 24 तासात सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 33 अंशवर राहिले. तसेच 3.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
advertisement
advertisement









