Tulsi puja: तुळशीला जल अर्पण करताना 11 वेळा म्हणायचा हा मंत्र; घरातील सुख-समृद्धी राहते अबाधित
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tulsi Puja Tips Marathi : आपल्याला सुख-समृद्धी, यश, पैसा मिळावा, घरात शांतता राहावी, असं प्रत्येकाला वाटतं. कुटुंबात सुख-शांती असल्यास जीवन आनंदी राहतं. यासाठी काही जण आध्यात्मिक, ज्योतिष किंवा वास्तुशास्त्रानुसार उपाययोजना करतात. हिंदू धर्मात तुळशीला विशेष स्थान आहे. नियमितपणे तुळशीची आराधना केली तर घरात धनवृद्धी होते असं मानलं जातं.
ज्या घरात तुळशीचं रोप असतं त्या घरात सुख-समृद्धी वास करते, असं ज्योतिष जाणकार सांगतात. तुम्ही आर्थिक टंचाईचा सामना करत असलात, तर तुळशीसंदर्भातले काही उपाय नक्की करून पाहा. हे उपाय नियमित केले तर तुमच्या घरात कधीच दारिद्र्य येणार नाही. तसंच घरात कायम सकारात्मकता राहील. हे उपाय कोणते आहेत, ते सविस्तर जाणून घेऊ या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ज्योतिष अभ्यासकांच्या मते, तुळशीला जल अर्पण करताना ॐ सुभद्राय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. यामुळे आर्थिक समस्या दूर होतात आणि लक्ष्मीमातेची विशेष कृपादृष्टी प्राप्त होते. धर्मशास्त्रानुसार, तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णू नैवेद्याचा स्वीकार करत नाहीत. जे तुळशीची मनोभावे पूजा करतात, त्यांच्या घरात कधीच दारिद्रय येत नाही, असं मानलं जातं. त्यामुळे घरात सुख-समृद्धी,पैसा राहावा यासाठी नियमित तुळशीची उपासना गरजेची आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)