Ganeshotsav 2025: बाप्पा मोरया! मुंबईतल्या प्रसिद्ध गणपतींचं देखणं रूप, भक्तांसाठी पहिली झलक, पाहा PHOTO

Last Updated:
Mumbai Gageshotsav: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून मुंबईत बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरू आहे. मुंबईतील 5 प्रसिद्ध गणेश मंडळांच्या बाप्पांची पहिली झलक पाहुया. (फोटो: गणेश काळे)
1/7
महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबईचा गणेश उत्सव तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. आता अवघ्या काही दिवसांत बाप्पांचं आगमन होणार आहे. मुंबईत विविध गणेश मंडळांची तयारीसाठी लगबग दिसत आहे. 5 प्रसिद्ध गणपती मंडळांच्या बाप्पांची पहिली झलक पाहू.

advertisement
2/7
मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील स्लेटर रोडचा राजा गणेश मंडळ प्रसिद्ध आहे. यंदा स्लेटर रोडच्या राजाचं (ग्रँट रोड) देखणं रूप डोळ्याचं पारणं फेडणारं आहे. शंख चक्रधारी चतुर्भूज रुपात असणारी बाप्पांची मूर्ती भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी आहे.

3/7
कामाठीपुऱ्याचा कृपाळू गणपती देखील प्रसिद्ध आहे. यंदा बाप्पांची शंखधारी मूर्ती अत्यंत आकर्षक आणि देखणी आहे.

4/7
मुंबईतील अखिल चंदणवाडीचा गोड गणपती प्रसिद्ध आहे. यंदा या मंडळाची पृथ्वीवर उभ्या स्वरुपात बाप्पांची चतुर्भूज मूर्ती असून एका हातात शंख आहे. बाप्पांचं अत्यंत देखणं रुप भक्तांना भूरळ घालणारं आहे.

5/7
ताडदेव कंपाउंडचा राजा मुंबईत प्रसिद्ध आहे. अगदी उभ्या स्वरुपातील बाप्पांची मूर्ती उंचच उंच आहे. बाप्पांची मूर्ती चतुर्भूज असून भक्त पाहताक्षणी मंत्रमुग्ध होणार आहेत.

6/7
मुंबईतील कामाठीपुरा येथील पंचशील विघ्नहर्ता गणेश मंडळ प्रसिद्ध आहे. बाप्पांची मूर्ती उभ्या रुपात असून चतुर्भूज आहे. एका हातात तलवार असून बाप्पा ढालीवर उभे दिसत आहेत.

7/7
मुंबईत अनेक प्रसिद्ध गणेश मंडळे आहेत. गणपती आगमन काही दिवसांवर आले असून मोठ्या जल्लोषात बाप्पांच्या मूर्ती आणल्या जात आहेत. (फोटो: गणेश काळे)

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement