Guru Pushya Yoga 2024: आज पौर्णिमेदिवशीच गुरुपुष्यामृत! या उपायांनी जुळतील धनलाभाचे योग, वाढेल सुख-संपत्ती
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Guru Pushya Yoga upay: यंदा पौष पौर्णिमा गुरुवारी 25 जानेवारीला आहे. त्या दिवशी गुरुपुष्यामृत योगही तयार होत आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्य योग तयार होतो. हा योग आपल्या जीवनात यश आणि मंगल गोष्टी आणतो, असे मानले जाते. या योगात खरेदी, व्यवसाय सुरुवात इत्यादी करणे शुभ मानतात. त्या दिवशी केलेल्या गोष्टींमध्ये निरंतर वाढ होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पुरी येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा यांच्याकडून जाणून घेऊया, पौष पौर्णिमेला गुरू पुष्यामृत योगामध्ये कोणते 5 उपाय केले पाहिजेत, ज्यामुळे धन आणि सुख संपत्ती वाढेल.
advertisement
पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्यामृत योगाव्यतिरिक्त रवियोग, अमृत सिद्धी योग आणि प्रीती योगही तयार होत आहेत. पौष पौर्णिमा हा नवीन कार्य सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे. रवि योग सकाळी 07:13 ते 08:16 पर्यंत आहे, अमृत सिद्धी योग 26 जानेवारी रोजी सकाळी 08:16 ते 07:12 पर्यंत आहे आणि प्रीती योग सकाळी 07:32 ते रात्रभर आहे. (कॅनव्हा)
advertisement
गुरुपुष्य योगामध्ये देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी. पूजेच्या वेळी कनकधारा स्तोत्राचा पाठ करा. देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा. भगवान विष्णूला पंचामृत, तुळशीची पाने, गूळ आणि हरभरा डाळ अर्पण करा. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने आपले जीवन धन, संपत्ती, सुख आणि समृद्धीने भरून जाईल. (कॅनव्हा)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पौष पौर्णिमेच्या रात्री चंद्र देवाची पूजा करा. रात्री पाण्यात दूध, पांढरी फुले आणि अक्षत टाकून त्यानं चंद्राला अर्घ्य अर्पण करावे. ओम सों सोमाय नम: चंद्र बीज मंत्राचा जप करा. (कॅनव्हा) (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)