कार्तिकी एकादशी 2025: पंढरीत एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठलाची महापूजा, ZP शाळेच्या विद्यार्थ्यांनाही पूजेचा मान
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Kartiki Ekadashi 2025: कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. यंदा नांदेडच्या दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला.
advertisement
दरवर्षी कार्तिकी एकादशीला परंपरेनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी महापूजा करतात. यंदा देखील दर्शन रांगेतून माळकरी वारकरी जोडप्याची महापूजेसाठी निवड झाली. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील पोटा गावचे वारकरी रामराव बसाजी वालेगावकर व सुशीलाबाई रामराव वालेगावकर या दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला. वालेगावकर हे गेल्या 20 वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत.
advertisement
यंदा कार्तिकी एकादशीला दोन विद्यार्थ्यांना देखील महापूजेचा मान देण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची एक विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थी महापूजेत सहभागी झाला. यामध्ये पापरी येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी मानसी आनंद माळी आणि देवडी येथील शाळेचा विद्यार्थी आर्या समाधान थोरात यांना हा मान मिळाला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
यावेळी पंढरपूरची चंद्रभागा ही वारकऱ्यांसाठी पवित्र गंगा असून ती कायमस्वरुपी प्रदूषणमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून नगर विकास खात्याकडून चंद्रभागा नदीच्या प्रदुषण मुक्तीसाठी 120 कोटी रुपये निधी दिला असून यातील पहिल्या टप्प्याचं काम सुरू आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


