पुण्यातील पथक करणार अयोध्येत शंखनाद; राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी निमंत्रण PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पुण्यातील या पथकाला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या कार्यक्रमासाठी शंखनाद करण्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गेली 8 वर्ष केशव शंखनाद पथक पुणे महानगरात नागरिकांना केशव शंखनाद पथक मोफत प्रशिक्षण चालवत आहे. गणेश उत्सव, धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन शंखवादन करत आहे. 22 जानेवारी रोजी श्री रामलल्ला विराजमान होणार आहे. श्री राम जन्म भूमीमध्ये आपल्याला शंख वादन करण्याची संधी चम्पत राय यांनी आमंत्रित करून दिली आहे. 18 जानेवारीला अयोध्येत जाऊन 23 आणि 24 तारखेला इथे शंख वादन करणार आहोत.
advertisement
केशव शंखनाद पथकाचे 111 शंख वादक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. वय वर्ष पाच पासून ते 85 वर्षा पर्यंत लोक अयोध्येकडे प्रस्थान करत आहे. पथकाच वैशिष्ट्य असं की 111 लोकांमध्ये वय वर्ष 85 आणि त्या आतील तरुण- तरुणी सहभागी आहेत. जेव्हा आम्हाला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्यासाठी निमंत्रण आलं तेव्हा खूपच आनंद झाला, अशी माहिती पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांनी दिली आहे.
advertisement


