4 राशींच्या व्यक्तींनी पैसे मोजायला तयार राहावं! जन्माष्टमीला सुधरू शकते परिस्थिती
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Janmashtami 2024 horoscope: संपूर्ण देशभरात 26 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होईल. या दिवशी अत्यंत दुर्मीळ योग जुळून येणार आहेत. ज्योतिषी पंडित आनंद भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा जन्माष्टमीला सर्वार्थ सिद्धी, गजकेसरी आणि शश हे शुभ योग निर्माण होतील. ज्यांचा 4 राशींवर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडेल. या राशींच्या व्यक्तींना येत्या काळात भरपूर सुख अनुभवायला मिळेल, असं ज्योतिषी म्हणाले. (शुभम मरमट, उज्जैन)
advertisement
वृषभ : या राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र. त्यामुळे जन्माष्टमीला जुळून येणाऱ्या विशेष संयोगाचा या राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळेल. नोकरी, व्यवसायाची स्थिती आता आधीपेक्षा सुधारेल. आव्हानं कमी होतील. जुन्या मालमत्तेतून फायदा मिळू शकतो, आर्थिक स्थिती भक्कम होईल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल. कुटुंबात प्रसन्न वातावरण असेल.
advertisement
सिंह : या राशीचा स्वामी ग्रह आहे सूर्य. त्यामुळे जन्माष्टमीला जुळून येणाऱ्या दुर्मीळ योगांमुळे साक्षात श्रीकृष्णाचा आशीर्वाद या राशीच्या व्यक्तींना मिळेल. याचा सर्वाधिक फायदा होईल करियरमध्ये. पैशांबाबतच्या सर्व अडचणी आता हळूहळू दूर होतील. या व्यक्तींनी कृष्णाला खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करणं लाभदायी ठरेल.
advertisement
advertisement









