Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनादिवशी भ्रदाकाल, राखी कधी आणि कशी बांधावी?

Last Updated:
यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत, तर दुसरीकडे यादिवशी भद्राकाळ देखील असणार आहे. त्यामुळे राखी बांधण्याचा नेमका मुहूर्त कोणता आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
1/6
भाऊ-बहिणींचे नातेसंबंध जपणारा, या नात्यातील गोडवा टिकवून ठेवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण अखंड प्रेम, उत्साह, स्नेहभाव आणि पवित्रता घेऊन येतो. भावा-बहिणीतील स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगत करणारा हा सण यंदा 19 ऑगस्ट 2024 रोजी साजरा होत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, यादिवशी भद्राकाल असल्यामुळे राखी बांधण्याचा मुहूर्त दुपारनंतर आहे.

advertisement
2/6
श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात, व त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तर भाऊ त्याच्या बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देऊन प्रेमानं भेटवस्तू देतो.

3/6
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे 5 वाजून 53 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 32 मिनिटांपर्यंत भद्राकाल आहे. त्यामुळे या काळात राखी बांधू नये. याशिवाय रक्षाबंधनाच्या दिवशी सायंकाळी सात वाजल्यापासून पंचक सुरू होत आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या पंचकाला राजपंचक म्हणतात, व हे पंचक शुभ मानलं जाते. त्यामुळे याकाळात रक्षाबंधन साजरे करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी रक्षाबंधनाला राखी बांधण्याचा शुभमुहूर्त 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 32 मिनिटांपासून रात्री 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत आहे.

4/6
रक्षाबंधनादिवशी तयार होतोय शुभ योगहिंदू पंचागांनुसार श्रावण पौर्णिमा तिथी सोमवारी (19 ऑगस्ट 2024) पहाटे 3:04 वाजता सुरू होईल आणि 19 ऑगस्ट रोजी रात्री 11:55 वाजता समाप्त होईल. यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी विविध शुभ योग आहेत. रक्षाबंधनाचा दिवस श्रावणी सोमवार असून यादिवशी श्रावणी पौर्णिमा व्रत देखील आहे. याशिवाय यादिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि शोभन योग तयार होत आहेत.

5/6
भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक समजला जाणारा रक्षाबंधन सण अवघ्या पंधरा दिवसांवर आला आहे. त्यानिमित्त बाजारपेठ सजली आहे. रक्षाबंधनाचा सण हा मुहूर्तावर साजरा करण्यास धार्मिक महत्त्व आहे.

6/6
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement