शिवलिंगावर जलाभिषेक करताना टाळा या चुका, धर्मशास्त्रातील नियम माहितीयेत का?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Amita B Shinde
Last Updated:
महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करताना काही धार्मिक विधी आणि नियमांचे पालन करावे लागते. याबाबत वर्धा येथील पंडित हेमंतशास्त्री पाचखेडे यांनी माहिती दिली आहे.
भगवान शिवाला प्रसन्न करणे सर्वात सोपे असल्याचे धर्म शास्त्रांमध्ये सांगितले आहे. महादेव आपल्या भक्तांवर सहज प्रसन्न होतात म्हणून त्यांना भोलेनाथ म्हणतात. भगवान शंकर शिवलिंगावर जलाभिषेक केल्याने लगेच प्रसन्न होतात, असे मानले जाते. महादेवाच्या पूजेचे आणि जलाभिषेकाचे काही नियम धर्मशास्त्रात सांगितले आहेत. महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करताना काही धार्मिक विधी आणि नियमांचे पालन करावे लागते. याबाबत वर्धा येथील पंडित हेमंतशास्त्री पाचखेडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
ज्या गडव्याने किंवा पात्राने पिंडीवर पाणी अर्पण करत आहात तो शुद्ध धातूंचा असावा. चांदीचा किंवा सोन्याचा असला तर उत्तम आहे. तसेच तांब्याच्या पात्रातून तुम्ही शिवपिंडीवर जलाभिषेक करू शकता. मात्र कधीही स्टीलच्या भांड्यातून महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकू नये. असे केल्याने शुभ फळ प्राप्त होत नाही, असे पाचखेडे महाराज सांगतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement