ShivMantra: आज तिसरा श्रावण सोमवार! महादेवाची पूजा करताना या प्रभावी मंत्राचा करा जप
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
5 Powerful Mantras Of Lord Shiva : शंभू-महादेव सनातन धर्मातील सर्वात पूज्य देवता मानले जातात. कोट्यवधी भाविकांची भोलेनाथांवर श्रद्धा आहे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भाविक श्रावणातील दर सोमवारी जलाभिषेक करतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात. महादेवाची कुटुंबावर कृपा राहण्यासाठी, संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण सोमवारी खालील पाच मंत्रांचा नियमित जप करा. हे प्रभावी मंत्र तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणी दूर करू शकतात. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.
ओम नमः शिवायहा शंकराचा सर्वात लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध मंत्र आहे. याचा अर्थ मी महादेवासमोर नतमस्तक होतो. ज्योतिष शास्त्रानुसार या मंत्राचा दररोज 108 वेळा नियमित जप केल्यास तुमचे शरीर रोगांपासून मुक्त होते आणि तुमचे मन शांत राहते. या शिवाय या मंत्राचा जप केल्यानं भगवान शिवाची कृपा तुमच्यावर कायम राहील.
advertisement
advertisement
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् |उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ||
शंकराचा हा महामृत्युंजय मंत्र अत्यंत प्रभावशाली मानला जातो. जो कोणी या मंत्राचा रोज जप करतो, त्याला अकाली मृत्यूच्या भयापासून मुक्ती मिळते. त्या व्यक्तीसोबत कधीही कोणतीही अप्रिय घटना घडत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
advertisement
करचरणकृतं वाक् कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसंवापराधं ।विहितं विहितं वा सर्व मेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शम्भो॥
या मंत्राचा जप केल्यानं मनुष्याला नकळत, अजाणतेपणे केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते. प्रचलित मान्यतेनुसार, महादेवाकडून कर्माची क्षमा मागण्यासाठी या मंत्राचा जप करावा. यामुळे महा देव प्रसन्न होतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)








