गणेशोत्सवात घ्या नागपूरमधील 'या' 10 गणपतीचे दर्शन; भव्य देखावे फेडतील डोळ्यांचं पारणं
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
नागपूर शहरात अनेक गणेश मंडळांनीही भव्य देखावे तयार केले आहेत. त्यामुळे नागपुरातील हे प्रमुख दहा गणपती आवर्जून बघावे असेच आहेत.
आनंद, उत्साह आणि सर्वत्र जल्लोष निर्माण करत समाज मनामध्ये नवं चेतना निर्माण करणारा सण म्हणजे गणेशोत्सव. बापाच्या आगमनाने भक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. नागपूर शहरात अनेक गणेश मंडळांनीही भव्य देखावे तयार केले आहेत. त्यामुळे नागपुरातील हे प्रमुख दहा गणपती आवर्जून बघावे असेच आहेत. अश्याच काही मंडळांची माहिती तुम्हाला आज आम्ही देणार आहोत.
advertisement
नागपूरचा राजा : नागपूर नगरीचा राजा म्हणून प्रख्यात असलेला या गणपतीची सुरुवात सन 1995 साली सुरू झाली. यंदा मंडळाचे हे 28 वं वर्ष आहे. नागपूर शहरातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून देखील हा गणपती ओळखला जातो. गणपतीची आकर्षक मूर्ती त्यावर सोन्या चांदीच्या दागिन्यांनी सजलेली मूर्ती मन मोहून टाकणारी आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
संती गणेश उत्सव मंडळ : नागपुरातील प्रमुख मंडळापैकी एक असलेले संती गणेश उत्सव मंडळाने यंदा देखील आपल्या अप्रतिम देखाव्यांची मालिका कायम ठेवत यंदा तामिळनाडू येथील मदुराईच्या मीनाक्षी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे. ज्यामध्ये गणरायासह साक्षात श्री मीनाक्षी देवीच्या दर्शनाचा देखील लाभ नागपूरकरांना घेता येणार आहे.
advertisement
तात्या टोपे नगर गणेश उत्सव समिती : यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे हे साडेतीनशे वर्ष असल्याने यंदा टाटा टोपे नगर गणेश उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारले आहेत. यामध्ये राजगड आणि रायगड या दोन राजधानींच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement