BAPS Hindu Mandir: अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराची ही आहेत खास वैशिष्ट्ये; दगडी वास्तुकलेचा अजोड नमुना
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
BAPS Hindu Mandir: अबुधाबीतील पहिल्या मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाल्यानंतर 18 फेब्रुवारीपासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं आहे. बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था हिंदू मंदिर अर्थात बीएमपीएस मंदिर हे यूएईमधलं पहिलं हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान स्वामीनारायण यांना समर्पित आहे.
बीएपीएस मंदिर हे आखाती देशातील सर्वात मोठं मंदिर आहे. हे मंदिर मोठ्या क्षेत्रफळावर उभारण्यात आले असून, दगडी स्थापत्यकलेचा अजोड नमूना आहे. हे मंदिर सुमारे 27 एकर जागेवर विस्तारलेले आहे. त्यामध्ये 13 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर मंदिराचं बांधकाम करण्यात आलं आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी उर्वरित जागेवर पार्किंग एरिया तयार करण्यात आला आहे. या मंदिराचं बांधकाम 2019 मध्ये सुरू झालं होतं.
advertisement
या मंदिराच्या उभारणीसाठी संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई सरकारने जमीन दान केली होती. युएईमध्ये आणखी तीन हिंदू मंदिरं असून ती दुबईत आहेत. बीएपीएस हे अबूधाबीतील पहिले हिंदू मंदिर आहे. हे मंदिर दुबई-अबूधाबी शेख जायद महामार्गावर आहे. मंदिर उभारणीसाठी सुमारे 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यात सुमारे 18 लाख विटांचा वापर करण्यात आला आहे.
advertisement
advertisement
मंदिर भव्य व्हावं यासाठी राजस्थानमध्ये दगडांवर कोरीव काम करण्यात आलं.जयपूरच्या गुलाबी वाळूच्या दगडाचा वापर मंदिराच्या उभारणीकरिता केला गेला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर याच दगडाचा वापर करून बांधले गेले आहे.या संगमरवरी मंदिरातील प्रत्येक खांबावर श्री हनुमान, श्रीराम, सीतामाता, श्री गणेश यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजूला असलेल्या खांबांवर सीता स्वयंवर, श्रीराम वनगमन, श्रीकृष्ण लीलांचा समावेश आहे.
advertisement
अबुधाबीत बांधलेले हे हिंदू मंदिर काशी विश्वनाथ कॉरिडॉरपेक्षा मोठं आहे. मंदिराच्या मधोमध स्वामीनारायण यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. भारत आणि यूएईच्या संस्कृतींचा मिलाफ दाखवण्यासाठी मंदिरात सात मिनार देखील आहेत. मंदिरात तापमान मोजण्याकरिता आणि भूकंपाच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्यासाठी 300 हून जास्त हायटेक सेन्सर बसवण्यात आले आहेत.
advertisement
बीएपीएस मंदिराच्या बांधकामात कोणत्या धातूचा वापर करण्यात आलेला नाही. पायाभरणीसाठी फ्लाय अॅशचा वापर केला गेला आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंनी गंगा आणि यमुनेचं पवित्र पाणी वाहत आहे. हे पाणी भारतातून एका मोठ्या कंटेनर्सद्वारे येथे आणले गेले आहे. हे मंदिर खूप भव्य आणि विशाल आहे. यात दिल्लीतील अक्षरधाम मंदिराची झलक पाहायला मिळते.
advertisement
बीएपीस ही संस्था सामाजिक-आध्यात्मिक हिंदू धर्माचं प्रतिनिधीत्व करते. 18 व्या शतकाच्या अखेरीस भगवान स्वामीनारायण यांनी या संस्थेची सुरुवात केली. संस्थेने जगभरात 1200 पेक्षा जास्त हिंदू मंदिरं उभारली आहेत. संस्थेची जगात 3850 पेक्षा जास्त केंद्र आहेत. बीएपीएसला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.