रात्र झाली की, आजही 'या' मंदिरात येतो भनायक आवाज; छत नसलेल्या मंदिरामागचं रहस्य काय?
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
हिरापूर गावात चौसष्ठ योगिनी मंदिर हे शक्तीपीठ आहे. इ.स. 864 मध्ये राणी हिरादेवी यांनी बांधलेले हे भारतातील पहिले छप्पर नसलेले योगिनी मंदिर आहे, जे महामाया पीठ...
advertisement
हे मंदिर इ.स. 864 मध्ये लोणाभद्रा ऊर्फ शांतिकर्देव द्वितीय यांच्या भूमी वंशाची राणी हिरादेवी यांनी बांधले होते असे मानले जाते. हे भारतातील पहिले चौसष्ठ योगिनी मंदिर आहे. स्थानिक पुजाऱ्यांच्या मते, या मंदिरामागील आख्यायिका अशी आहे की, एका राक्षसाचा पराभव करण्यासाठी देवी दुर्गाने 64 देवींचे रूप घेतले होते. या देवीसाठीच हे चौसष्ठ योगिनी मंदिर बांधले गेले.
advertisement
या मंदिराचे स्थापत्यशास्त्र तुम्हाला आश्चर्यचकित करेल. सर्वसाधारणपणे सर्व मंदिरांचा वरचा भाग बंद असतो, तर या मंदिराचा वरचा भाग पूर्णपणे खुला आहे. हे छत नसलेले मंदिर तांत्रिक प्रार्थनांसाठी बांधण्यात आले आहे. तांत्रिक विधींमध्ये पृथ्वी म्हणजेच पंचमहाभूते - अग्नी, जल, पृथ्वी, वायू आणि आकाश यांची पूजा केली जात असल्याने, मंदिराचा वरचा भाग खुला ठेवला जातो.
advertisement
advertisement


