वर्षांमागून वर्ष सरले, आला अद्भुत योग; हनुमान जयंतीला शनीदोष दूर करण्याची सुवर्णसंधी
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमा तिथीला हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी मारुतीरायांची मनोभावे पूजा केल्यास मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. शिवाय आयुष्यातली सर्व संकटं हळूहळू दूर होतात. कारण मारुतीरायांना कलीयुगाचा देवता मानलं जातं. विशेषतः ज्यांच्या कुंडलीत शनी दोष असेल त्यांनी या दिवशी मारुतीरायांना आवर्जून साकडं घालावं. त्यात यंदाची हनुमान जयंती अत्यंत खास आहे, कारण यावेळी अनेक शुभ योग जुळून आले आहेत. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी सांगितलं की, 23 एप्रिलला संपूर्ण देशभरात हनुमान जयंतीचा उत्सव अत्यंत धुमधडाक्यात साजरा होईल. कित्येक वर्षांनी असा योग जुळून आला आहे की, मंगळवारी सर्वार्थ सिद्धी योगात, शुभ नक्षत्रात हनुमान जयंतीचा सण साजरा होईल. अशात शनी दोषापासून मुक्ती हवी असेल तर या दिवशी कुंकवात चमेलीचं तेल मिसळून त्याचा मारुतीरायांना टिळा लावा. त्यांना वस्त्र अर्पण करा. यामुळे कुंडलीतील सर्व शनीदोष नष्ट होतील. साडेसातीपासूनही मुक्ती मिळेल.
advertisement
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, पौर्णिमेच्या दिवशी चित्रा नक्षत्र निर्माण होणार आहे. शिवाय याच दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि वज्र योग जुळून आले आहेत. हे दोन्ही योग प्रचंड शुभ मानले जातात. त्यामुळे या दिवशी जर आपण मारुतीरायांची मनोभावे पूजा केली, तर आपल्या अडचणी नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. शिवाय लवकरच आयुष्यात सुख, समृद्धीचं आगमन होईल.
advertisement
advertisement
advertisement








