Tulsi Tips: नवीन तुळस लावण्याची योग्य वेळ, योग्य दिवस कोणता? चांगली वाढते, सुबत्ता राहते
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tulsi Tips Marathi : हिंदू धार्मिक लोक आपल्या घरात तुळशीचे रोप नक्की लावतात. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. तुळशीची पूजा आणि तिची काळजी घेतल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते, अशी श्रद्धा आहे. तुळशीकडून सकारात्मक फायद्यांसाठी ती योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी लावण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
तुळस लावण्यासाठी योग्य वेळ -ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने तुळशीची लागवड करण्यासाठी उत्तम काळ मानला जातो. ऋतुमानानुसार तसेच धार्मिक दृष्टिकोनातून ही योग्य वेळ आहे. तुळशीची लागवड करण्यासाठीही फेब्रुवारी हा देखील चांगला काळ मानला जातो. याकाळात तुळस लावल्यानं रोप सुकत नाही. यावेळी जास्त उष्णता किंवा थंडी नसते, त्यामुळे ही वेळ चांगली आहे.
advertisement
advertisement
advertisement