T20 World Cup : संजू आणि अभिषेकला संघाबाहेर का काढलं नाही? या 2 गोष्टीवर गंभीरने जिंकवला वर्ल्ड कप!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Gautam Gambhir On Trust And faith : गौतम गंभीरने या यशाचे श्रेय खेळाडूंवरील विश्वासाला दिलं आहे. तुम्ही टीमची निवड ही आशा (hope) ठेवून नाही, तर विश्वास आणि श्रद्धेवर (trust and faith) करता.
Why Team India Back Abhishek Sharma : यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची टॉप ऑर्डर सर्वात घातक ठरली. खासकरून संजू सॅमसन आणि ईशान किशनने टीम इंडियाला सर्व सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं. टीम इंडियासाठी चिंतेचा विषय होता अभिषेक शर्मा याचा... अभिषेक शर्मा याला संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये सुर गवसला नाही. पण अखेरच्या सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली. तर संजूला सुरूवातीच्या काही सामन्यात खेळला नाही. त्यावर टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर याने मोठा खुलासा केला आहे.
सात मॅचमध्ये केवळ 89 रन्स
अभिषेक शर्माने या वर्ल्ड कपमध्ये फायनलपूर्वी सात मॅचमध्ये केवळ 89 रन्स केले होते, ज्यात 3 वेळा तो शून्यवर आऊट झाला होता. मात्र, गंभीरने त्याला बॅक केले आणि अभिषेकने फायनलमध्ये केवळ 18 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी झळकावत या वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान पन्नास रन्स पूर्ण केले. त्याच्या या स्फोटक खेळीने सुरुवातीलाच न्यूझीलंडच्या बॉलरवर दबाव निर्माण केला.
advertisement
संजूची 89 रन्सची मॅराथॉन खेळी
दुसरीकडे, संजू सॅमसनला वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये 5 मॅचमध्ये केवळ 46 रन्स करता आले होते. तरीही गंभीरने त्याला संघात कायम ठेवले. संजूने सलग 3 मॅच-विनिंग हाफ सेंच्युरी झळकावून टीकाकारांना चोख उत्तर दिलं. त्याने कोलकात्यात वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 97, इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये 89 आणि फायनलमध्ये पुन्हा एकदा 89 रन्सची मॅराथॉन खेळी साकारली. त्यावर गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली.
advertisement
विश्वास आणि श्रद्धा
गौतम गंभीरने या यशाचे श्रेय खेळाडूंवरील विश्वासाला दिलं आहे. तुम्ही टीमची निवड ही आशा (hope) ठेवून नाही, तर विश्वास आणि श्रद्धेवर (trust and faith) करता. जेव्हा तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवता, तेव्हा 4 ते 5 मॅचमधील अपयशानंतर तो विश्वास ढळू द्यायचा नसतो असं गंभीरने म्हटलं आहे. संजूला काही मॅच विश्रांती देणं हा एक तांत्रिक बदल होता, असंही त्याने नमूद केलं.
advertisement
नेट प्रॅक्टिसमधील संजूची बॅटिंग
दरम्यान, संजू फॉर्ममध्ये नाही असे आम्हाला कधीच वाटले नाही. न्यूझीलंड सीरिज नंतर त्याला थोड्या आरामाची गरज होती जेणेकरून तो दडपणातून बाहेर पडू शकेल. त्याच्याकडे असलेली टॅलेंट आणि नेट प्रॅक्टिसमधील त्याची बॅटिंग पाहता, तो मोठी कामगिरी करेल याची आम्हाला खात्री होती, असंही गंभीर यावेळी म्हणाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 10:58 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : संजू आणि अभिषेकला संघाबाहेर का काढलं नाही? या 2 गोष्टीवर गंभीरने जिंकवला वर्ल्ड कप!









