Astrology: तब्बल महिन्याभराने राहूच्या प्रभावातून बाहेर आला सूर्य, हा आठवडा 5 राशींसाठी शुभ!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात सोमवार, 15 एप्रिलपासून होतेय. 14 एप्रिलला सूर्याचा मेष राशीत प्रवेश झाल्याने तिथे सूर्य आणि गुरूची युती झाली. त्यामुळे हा आठवडा अत्यंत शुभ असणार आहे. झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास महिन्याभरानंतर सूर्य राहूच्या प्रभावातून बाहेर आलाय, त्यामुळे सुरू होणारा काळ जसा काही राशींसाठी सुखाचा असेल, तसंच काही राशींच्या वाट्याला ग्रहण येणार हे नक्की. (परमजीत, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
advertisement
advertisement
कर्क : आपल्यासाठी हा आठवडा सकारात्मक आहे. कामकाज विस्तारेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागेल. नोकरीच्या शोधात असाल तर आता चांगली संधी मिळेल. जमीन, मालमत्ता खरेदी करायची असल्यास हा काळ उत्तम आहे. घरात शुभकार्य पार पडण्याची शक्यता आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेले वाद आता संपण्याचीही शक्यता आहे.
advertisement
सिंह : आपल्यासाठी हा आठवडा नकारात्मक आहे. साथीचे आजार ओढवू शकतात. त्यामुळे रुग्णालयात जावं लागू शकतं. आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका, त्यातून नुकसान होऊ शकतं. कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका, त्यातूनही तुमचं नुकसान होईल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागणार नाही. आपण मारुतीरायाची पूजा करून सुंदरकांडाचं पठण करावं.
advertisement
कन्या : आपल्यासाठी हा आठवडा नकारात्मक आहे. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती असेल. त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडेल. खर्च विचारपूर्वक करा. जास्त खर्च झाल्यामुळे मानसिक ताण येईल. कामानिमित्त लांबचा प्रवास होऊ शकतो, त्यातही भरपूर खर्च होईल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपण सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक केल्यास फायदेशीर ठरेल.
advertisement
advertisement
वृश्चिक : आपल्यासाठी हा आठवडा चढ-उताराचा आहे. कामकाजात आर्थिक लाभ होईल, परंतु शब्द जरा जपून वापरा. कुटुंबातील व्यक्तींसोबत भांडण होऊ शकतं. विशेषतः भाऊ-बहिणीचं भांडण होईल. त्यामुळे लहान-लहान गोष्टींचा बाहू करू नका. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या, नाहीतर आपलं नुकसान होऊ शकतं. आपण दुर्गा देवीची पूजा करून दुर्गा चालीसेचं पठण करावं.
advertisement
advertisement
मकर : आपल्यासाठी हा आठवडा नकारात्मक आहे. कोणत्याच वादात पडू नका, नाहीतर नुकसान होईल. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांमुळे धावपळ होऊ शकते. खर्च जास्त झाल्याने मानसिक ताण येईल. पोटाचे विकार होतील. कोणताही निर्णय भावनिक होऊन घेऊ नका. शत्रूंपासून सावध राहा. शनीची कुदृष्टी पडल्याने आपण अडचणीत याल, त्यामुळे शनिवारी शनी मंदिरात जाऊन मोहरीचं तेल अर्पण करावं.
advertisement
advertisement
मीन : आपल्यासाठी हा आठवडा चढ-उताराचा असणार आहे. शत्रूंपासून खूप जपून राहावं लागेल. कोणत्याही गोष्टीवरून आपल्याच लोकांशी वाद होऊ शकतात. कोणालाच पैसे उधार देऊ नका, त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. नोकरीत वरिष्ठांसोबत वाद होतील. या आठवड्यात कोणतीही गुंतवणूक करू नका. लव्ह लाइफ चांगली राहावी असं वाटत असेल तर पार्टनरच्या भावनांचा आदर करा. आपण भगवान विष्णूंची पूजा आणि विष्णू कवच पठण करणं फायदेशीर ठरेल.
advertisement