या वर्षातील शेवटचं सूर्ग्रहण केव्हा होणार? भारतात दिसणार का?
- Published by:Prachi Dhole
- trending desk
Last Updated:
Surya Grahan 2024: या वर्षी एप्रिल 2024 मध्ये वर्षातील पहिलं सूर्यग्रहण झालं होतं; पण तुम्हाला माहिती आहे का, या वर्षात आणखी एक सूर्यग्रहण होणार आहे.
advertisement
advertisement
या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल 2024 रोजी झाले. हे सूर्यग्रहण प्रामुख्याने अमेरिका आणि आसपासच्या देशांमध्ये दिसलं होतं. भारतामध्ये मात्र हे ग्रहण दिसलं नाही. आता या वर्षी होणारं दुसरं सूर्यग्रहण भारतात दिसणार का? सूर्यग्रहण कोणत्या तारखेला होणार? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. चला तर, आज या बाबतच जाणून घेऊ.
advertisement
advertisement
सूर्यग्रहणाचा सुतक काळ केव्हा सुरू होईल?सूर्यग्रहणाचा काळ म्हणजे सुतक काळ असं मानलं जातं. पण हा काळ ग्रहणाच्या प्रकारावर आणि व्यक्तीच्या धार्मिक श्रद्धेवर वेगवेगळा असू शकतो. शास्त्रानुसार सुतक कालावधी सूर्यग्रहणाच्या 12 तास अगोदर सुरू होतो. जेव्हा सुतक कालावधी सुरू होतो, तेव्हा या काळात शुभकार्य करू नयेत अशी मान्यता आहे. या काळात अनेकजण पूजा करणंदेखील टाळतात. सुतक काळात मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात. ग्रहण संपल्यानंतर धार्मिक विधी करून हे दरवाजे उघडले जातात.
advertisement
भारतात ग्रहण दिसणार का?यंदाच्या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण म्हणजेच 2 ऑक्टोबर 2024 रोजी होणारे सूर्यग्रहण ब्राझील, कुक आयलंड, चिली, पेरू, होनोलुलु, अंटार्क्टिका, अर्जेंटिना, मेक्सिको, न्यूझीलंड, आर्क्टिक, फिजी, उरुग्वे, ब्युनोस आयर्स आणि बेका आयलंड या देशांमध्ये दिसणार आहे. भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही. कारण हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री होणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे ग्रहणाचा सुतक कालावधी वैध राहणार नाही. त्यामुळे सुतक पाळायची गरज नाही. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात होणारं सूर्यग्रहण हे या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे. परंतु हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही.
advertisement