advertisement

भारतात दिसणार वर्षातील पहिलं ग्रहण, मार्चमध्ये 'या' दिवशी लागणार; सुतक काळ, तारीख आणि अचूक वेळ आत्ताच करा नोट!

Last Updated:
2026 हे वर्ष खगोलीय घटनांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. या वर्षातील पहिलं ग्रहण हे आज लागलं असून थोड्याच दिवसात आणखी एक ग्रहण लागणार आहे. यावर्षी एकूण 4 ग्रहणे होतील ज्यात दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणांचा समावेश आहे.
1/7

2/7
आजच्या सूर्यग्रहणानंतर अवघ्या 15 दिवसांत आकाशात आणखी एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार असून, विशेष म्हणजे हे ग्रहण भारतातून दिसणार आहे. फेब्रुवारीतील सूर्यग्रहण भारतात दिसले नसले, तरी मार्चमधील हे चंद्रग्रहण भारतीयांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

3/7
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच होलिका दहन आणि होळीच्या मुहूर्तावर हे ग्रहण येत असल्याने याला धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टीने मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

4/7
हे ग्रहण 'खग्रास' स्वरूपाचे असले तरी, भारतात चंद्रोदयाच्या वेळी ते आधीच सुरू झालेले असेल. त्यामुळे भारताच्या बहुतेक भागांत हे ग्रहण 'खंडग्रास' स्वरूपात दिसेल. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये हे ग्रहण अधिक स्पष्ट आणि पूर्ण स्वरूपात दिसण्याची शक्यता आहे. याला 'ब्लड मून' असेही म्हटले जाते, कारण या ग्रहणादरम्यान चंद्र गडद लाल रंगाचा दिसतो.

5/7
ग्रहणाची तारीख आणि वेळ: वर्षातील पहिले चंद्रग्रहण मंगळवार, 3 मार्च 2026 रोजी लागणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 2:16 वाजता ग्रहणाचा उपच्छाया टप्पा सुरू होईल, परंतु भारतात ते संध्याकाळी चंद्रोदयानंतरच दिसू लागेल.

6/7
भारतात कधी दिसणार?: भारतात चंद्रोदयानंतर साधारणपणे संध्याकाळी 6:26 ते 6:47 दरम्यान ग्रहणाचे दर्शन होईल. मुंबई, पुणे आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये हे ग्रहण आंशिक स्वरूपात दिसेल, तर ईशान्य भारतात ते अधिक प्रखर असेल.

7/7
सूतक काळाचे नियम: हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने याचा 'सूतक काळ' पाळला जाईल. चंद्रग्रहणाचा सूतक काळ ग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी लागतो. त्यामुळे 3 मार्चच्या सकाळी 9:39 पासून सूतक काळ सुरू होईल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement