Arjun Tendulkar : 0,0,0,0... सचिनच्या पोराची लाजिरवाणी कामगिरी, ट्रेड करून पस्तावले लखनऊचे मालक!

Last Updated:
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने मुंबईची साथ सोडून गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या टीममध्ये स्थान मिळत नसल्यामुळे अर्जुन गोव्याकडून देशांतगर्त क्रिकेट खेळत आहे.
1/6
अर्जुन तेंडुलकर रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा आणि विजय हजारे ट्रॉफी (50 ओव्हर) मध्ये गोव्याकडून मैदानात उतरत आहे. ऑलराऊंडर असलेल्या अर्जुनला गोव्याकडून बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये चमक दाखवता येत नाहीये.

advertisement
2/6
मुंबईकडून संधी मिळत नसल्यामुळे अर्जुन गोव्याकडून खेळत आहे. गोव्याच्या टीममध्ये अर्जुनला खेळायची संधी तर मिळत आहे, पण या संधीचं अर्जुनला सोनं करता येत नाहीये, त्यामुळे अर्जुनचं गोव्याच्या टीममधलं स्थानही अडचणीत यायची शक्यता आहे.

3/6
विजय हजारे ट्रॉफीच्या 4 सामन्यांमध्ये अर्जुनला एकही विकेट मिळालेली नाही. तसंच बॅटिंगमध्येही अर्जुन तेंडुलकरच्या पदरी निराशा आली आहे. सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात अर्जुनने 9 ओव्हरमध्ये 49 रन दिले तर बॅटने 19 रन केले.

4/6
मुंबईविरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरची धुलाई झाली. 8 ओव्हरमध्ये अर्जुनने 9.80 च्या इकोनॉमी रेटने 72 रन दिले. तर बॅटिंगवेळी त्याने 27 बॉलमध्ये 24 रन केले. तर उत्तराखंडविरुद्ध अर्जुनने 8 ओव्हरमध्ये 54 रन दिले आणि 16 बॉलमध्ये 8 रन केले.

5/6
पंजाबविरुद्धच्या सामन्यात अर्जुनला 8 बॉलमध्ये 1 रन करता आली. याशिवाय त्याने 6 ओव्हरमध्ये 8 च्या इकोनॉमी रेटने 48 रन दिले. डावखुरा फास्ट बॉलर असलेल्या अर्जुनला एकही विकेट न मिळाल्यामुळे गोव्याला अडचणींचा सामना करावा लागत आहे. लागोपाठ तिसऱ्या सामन्यात गोव्याचा पराभव झाला आहे.

6/6
आयपीएल 2026 च्या लिलावाआधी मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला लखनऊ सुपरजाएंट्ससोबत ट्रेड केलं, त्याबदल्यात मुंबईने शार्दुल ठाकूरला टीममध्ये घेतलं. आयपीएल 2026 मध्ये अर्जुन लखनऊकडून खेळताना दिसेल, पण त्याचा फॉर्म लखनऊ सुपरजाएंट्ससाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement