IND vs AUS: सलामीच्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 निश्चित! 2 खेळाडूंवर घोडं अडलं, दोन्ही मॅचविनर
- Published by:Rahul Punde
Last Updated:
India vs Australia World Cup 2023 Match : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. सलामीच्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 जवळपास निश्चित झाली आहे. पण, समस्या दोन खेळाडूंची आहे. कारण दोघेही सामना विजेते आहेत.
टीम इंडिया 8 ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकातील सलामीचा सामना खेळणार आहे. एमए चिदंबरम स्टेडियमची विकेट नेहमीच फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त राहिली आहे. या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आला, तेव्हा या स्टेडियममध्ये एकदिवसीय सामना खेळला गेला, ज्यामध्ये पाहुण्या संघाच्या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी 6 विकेट घेतल्या. म्हणजे विश्वचषकादरम्यानही येथे फिरकी गोलंदाज वर्चस्व गाजवू शकतात. अशा स्थितीत या मोठ्या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग-11 मध्ये फिरकी गोलंदाज दिसणार आहेत. (@teamindia)
advertisement
टीम इंडियाने विश्वचषकापूर्वी आर अश्विनच्या रूपाने अनुभवी फिरकीपटूला आपल्या संघात सामील केले आहे. तो संभावी संघात नव्हता. अक्षर पटेलच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने शानदार गोलंदाजी केली होती. या 37 वर्षीय ऑफस्पिनरने इंदूर वनडेत 3 विकेट्सही घेतल्या होत्या. अश्विनच्या कॅरम बॉलला ऑस्ट्रेलियन फलंदाजांकडे कोणताही उपाय दिसला नाही.-एपी
advertisement
चेन्नई हे अश्विनचे घरचे मैदान असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात तो खेळण्याची दाट शक्यता आहे. असे झाले तर प्लेइंग-11 मधून कोणाला बसावे लागेल? हे ठरवणे खूप कठीण जाईल. अश्विन हा फिरकी गोलंदाज असल्याने त्याच्या जागी एकच फिरकी गोलंदाज जाण्याची शक्यता असून भारतीय संघात फक्त कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा आहेत. अशा स्थितीत अश्विनच्या जागी जडेजा किंवा कुलदीप बाहेर जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (आर अश्विन इन्स्टाग्राम)
advertisement
आतापर्यंत टीम इंडियाकडे एकही ऑफस्पिनर नव्हता. मात्र, अश्विनच्या आगमनानंतर भारताला ऑफस्पिनर मिळाला आहे. ज्या संघांच्या सलामीच्या क्रमात डावखुरे फलंदाज जास्त आहेत, त्या संघांविरुद्ध तो प्रभावी ठरू शकतो. ऑस्ट्रेलियाकडे वॉर्नर आणि कॅरीच्या रूपाने फलंदाजी क्रमवारीत टॉप-6 मध्ये दोन डावखुरे फलंदाज आहेत. अशा स्थितीत अश्विन प्रभावी ठरू शकतो. (आर अश्विन इन्स्टाग्राम)
advertisement
आता जर अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय प्लेइंग-11 मध्ये आला तर कोण बाहेर पडेल? रवींद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडू असून सातव्या क्रमांकावर फलंदाजीही करतो, त्यामुळे अशा परिस्थितीत त्याला बाहेर ठेवता येणार नाही. कुलदीप यादव हा दुसरा फिरकी गोलंदाज आहे. अशा स्थितीत त्याला अश्विनसाठी त्याग करावा लागू शकतो. (कुलदीप यादव इंस्टाग्राम)
advertisement
टीम इंडियाला चेन्नईत दोन ऐवजी तीन फिरकीपटूंसोबत खेळण्याचा पर्यायही आहे. त्या स्थितीत कुलदीप, जडेजा आणि अश्विन हे तिघेही खेळू शकतात आणि जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे दोन वेगवान गोलंदाज म्हणून खेळू शकतात. हार्दिक पांड्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका साकारू शकतो. रोहित हे काम चेन्नईमध्ये करू शकतो जिथे विकेट फिरकी गोलंदाजांना मदत करते. अश्विन चेन्नईमध्ये भरपूर क्रिकेट खेळला आहे. -एपी
advertisement
भारतीय फलंदाजी क्रमवारीत फारशी अडचण नाही. टॉप-5 फलंदाज जवळपास निश्चित आहेत. रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामी देतील. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर, श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर आणि यष्टीरक्षक केएल राहुल पाचव्या क्रमांकावर खेळेल. हार्दिक पांड्याला सहाव्या क्रमांकावर मॅच फिनिशरची भूमिका पार पाडावी लागणार आहे. (एपी)