Glenn Maxwell: 'विराटनं करियर वाचवलं पण सेहवागनं तर माझं...', ग्लेन मॅक्सवेलचा धक्कादायक खुलासा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Glenn Maxwell: सेहवागनं घाणेरडं राजकारण केलं, पण विराटनं...ग्लेन मॅक्सवेलचा धक्कादायक खुलासा
advertisement
advertisement
मॅक्सवेल 2014 ते 2017 पंजाब किंग्स संघाकडून आयपीएलसाठी खेळला होता. 2014 मध्ये त्याने 187 च्या स्ट्राइकरेटने 552 धावा केल्या होत्या. टीमला फायनलपर्यंत पोहोचवण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. 2017 रोजी मॅक्सवेलकडे टीमच्या कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली होती. त्याचवेळी वीरेंद्र सेहवाग पंजाब किंग्सचा मेंटॉर म्हणून आला.
advertisement
मॅक्सवेलने 13 इनिंगमध्ये 310 धावा केल्या होत्या. टीममधील खेळाडूंची कामगिरी कमी पडली. त्यामुळे या सीरिजमध्ये त्याने 14 पैकी सात सामने जिंकवून दिले, मात्र टीम प्लेऑफपर्यंत पोहोचू शकली नाही. अरुण कुमार फक्त नावालाच प्रशिक्षक होते. त्यावेळी टीम पूर्ण सेहवाग चालवत होता. टीममधील खेळाडू नेमकं काय सुरू आहे विचारायचे, मात्र मला त्यावेळी तिथे त्यांना उत्तर देता आलं नाही.
advertisement
टीमला कसं पुढे घेऊन जाता येईल याची चर्चा करण्यासाठी प्रशिक्षकांचा Whatsapp ग्रूप तयार करुन चर्चा करू शकतो, अशी कल्पना मॅक्सवेलनं मांडली. मात्र सेहवागने ही कल्पना फेटाळून लावली. इतकंच नाही तर रायझिंग सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब सामन्यात अवघ्या 73 धावांत सामना संपला. त्यावेळी पत्रकार परिषदेतही सगळ्या चुकांचं खापर माझ्या एकट्यावर फोडण्यात आलं.
advertisement
त्या पत्रकार परिषदेनंतर मी सेहवागला मेसेज केला आणि मला वाईट वाटल्याचं स्पष्ट सांगितलं. ते शेवटचं संभाषण त्यानंतर मी आणि सेहवाग पुन्हा कधीच बोललो नाही. त्याच दिवशी सेहवागबद्दल आदर आणि त्याला आदर्श मानणं बंद केलं. सेहवागनंही मला तुझ्यासारखा चाहता नकोय असं उत्तर दिल्याने मॅक्सवेल जास्त दुखावला गेला. त्यामुळे मॅक्सवेलनं कायमचं बोलणं बंद केल्याचं सांगितलं.
advertisement
advertisement
advertisement